सांगलीः राज्यात अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. सांगलीतील कवठेपिरान ग्रामपंचायतीत मात्र वेगळेच चित्र आहे. या गावा सरपंच आणि उपसरपंच पदावर पत्नी- पतीची निवड झाली आहे.

सांगलीतील कवठेपिरान ग्रामपंचायतीचा सगळा कारभार अधिकृतपणे एकाच कुटुंबाकडे आला आहे. सरपंचपदी अनिता माने यांची नियुक्ती झाली आहे तर, उपसरपंच म्हणून भीमराव माने यांची बिनरोध निवड झाली आहे. या आगोदर भीमराव माने यांनी गावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य ही पदे सांभाळली आहेत.

उपसंरपच म्हणून निवड झालेले भीमराव माने यांची आदर्श सरपंच म्हणून ओळख आहे. गेल्या ५० वर्षांपासून माने कुटुंबाची कवठेपिरान गावात सत्ता आहे. कवठेपिरान हे गाव हिंदकेसरी पै. मारुती माने यांचे गाव आहे.

वाचाः

दरम्यान, पारनेर तालुक्यातील वाळवणे गावातही तेच चित्र आहे. तेथे तर झाले असून बहुमत मिळाल्यानंतर दोन्ही पदांवर पती-पत्नीची बिनविरोध निवड करून गावकऱ्यांनी गावचा कारभारच पठारे कुटुंबियांच्या हाती सोपविला आहे.


वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here