दिल्ली दौऱ्यावर असलेले पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह बाहेर असलेल्या नेत्यांनी समर्थकांना नाना पटोलेंच्या स्वागताची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे समर्थकांनी पटोलेंच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. याच गर्दीत काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे मोबाइल फोन व पाकिट चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.
वाचाः
सोशल डिस्टनसिंगचा फज्जा
नाना पटोले नागपुरात पोहोचल्यानंतर ढोल-ताशांसह त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, यावेळी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचंही चित्र निर्माण झालं होतं.
वाचाः
दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पटोलेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. काँग्रेसकडील खात्यात फेरबदल झाल्यानंतर राज्य सरकारमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले आणि नितीन राऊत यांची सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार, असल्याची चर्चा आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times