मुंबईः देशभरात करोनाचा विळखा सैल होत असला तरी राज्यातील करोना रुग्णांच्या आकडेवारीत चढ उतार होताना दिसत आहे. आज करोनाचे रुग्ण पुन्हा वाढले आहे. ()

राज्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असताना करोनाच्या आकडेवारीत पुन्हा बदल होताना दिसत आहे. कालच्या तुलनेनं अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसंच, राज्याचा रिकव्हरी रेटही काही अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज राज्यात ३ हजार ४५१ करोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना बाधितांची संख्या २० लाख ५२ हजार २५३ इतकी झाली आहे.

वाचाः

राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याची संख्याही दिलासादायक आहे. आज राज्यात २ हजार ४२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ३६ हजार ९४६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. ७ टक्के इतके झाले आहे. तर, महाराष्ट्रात सध्या ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आज राज्यात ३० करोनाबाधितांनी उपचारादरम्यान आपला जीव गमवला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५० टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५१,०८,६४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५२,२५३ (१३.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६५,९९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here