कोल्हापूर: कर्जबाजारी झालेल्या युवकाने एका ओळखीच्या वृद्धेचा खून करून तिच्या शरिराचे तुकडे केले, ते तुकडे राजाराम तलावात टाकले. तिच्या अंगावर असलेले दागिने विकून कर्जमुक्त होण्यासाठी त्याने हे कृत्य केले, पण तासाभरात पोलिसांनी या खूनाचा छडा लावला आणि संशयित आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान, खून झालेल्या वृद्धेचे नाव असून आरोपीचे नाव असे आहे. ( )

वाचा:

राजाराम तलावाच्या परिसरात सकाळी फिरायला आलेल्या लोकांना एका गोणीत मृतदेहाचे काही तुकडे दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, वृद्ध महिलेच्या शरिराचे तुकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेण्यात आली व पोलिसांची चार पथके कार्यरत करण्यात आली. यामध्ये चार दिवसांपासून पाचगाव येथील शांताबाई आगळे बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांडून मृतदेहाची ओळख पटवून घेण्यात आली. मृतदेहाचे तुकडे शांताबाई यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या तासाभरातच पोलिसांनी त्याला हुडकले.

वाचा:

शांताबाई यांचा खून संतोष परीट याने केला असून तो कर्जबाजारी आहे. शांताबाई यांना तो ओळखत होता. तिच्या अंगावर दागिने असल्याचे त्याला माहीत होते. ते दागिने मिळवण्यासाठी देव कार्य करण्याच्या निमित्ताने त्याने तिला आपल्या घरी बोलावले आणि तिच्या अंगावर दागिने काढून घेऊन तिचा खून केला. तिच्या शरिराचे तुकडे करून ते तलावाच्या परिसरात टाकले. त्याने खूनाची कबुली दिली असून अधिक तपास ठाण्याचे करत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here