वाचा:
कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले यांच्या लॅपटॉपचा डिजिटल फॉरेन्सिक अहवाल त्यांचे वकील सुदीप पासबोला यांनी हायकोर्टात सादर केला. या लॅपटॉपची इलेक्ट्रॉनिक कॉपी आर्सेनल कन्सल्टिंगला पाठवण्यात आली होती. त्याआधारे आर्सेनलने तपास करून आपला अहवाल दिला आहे. त्यात विल्सन यांच्या लॅपटॉपमधील स्फोटक पत्रे हॅकर्सनी प्लांट केली होती, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधारेच विल्सन यांच्यावरील सर्व आरोप रद्द करण्यात यावेत आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती पासबोला यांना हायकोर्टात केली आहे.
वाचा:
आर्सेनल कन्सल्टिंगला नेमकं काय आढळलं?
आर्सेनल कन्सल्टिंगने रोना विल्सन यांच्या लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात महत्त्वाची माहिती पुढे आली. विल्सन यांना अटक होण्याआधीच त्यांच्या लॅपटॉपवर हॅकर्सने ताबा मिळवला होता. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकरने या लॅपटॉपमध्ये स्फोटक माहिती असलेली दहा पत्रे प्लांट केली. हिडन फाइल्स बनवून ही पत्रे सेव्ह करण्यात आली. या फाइल्स विल्सन यांनी ओपनही केलेल्या नाहीत, असे आर्सेनलच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हा हॅकर कोण आहे, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. विल्सन यांच्या लॅपटॉपमध्ये जवळपास २२ महिने सातत्याने हॅकर्सनी अॅटॅक केल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक टॅम्परिंग प्रकरणात आम्ही आजवर तपास केला मात्र हे प्रकरण सर्वात गंभीर असल्याचे मतही कंपनीने नोंदवले आहे. अशाचप्रकारे आणखीही लॅपटॉपमध्ये घुसखोरी झाली असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
वाचा:
पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?
मुख्य म्हणजे याच पत्रांच्या आधारावर पोलिसांनी विल्सन यांना अटक केली होती. पंतप्रधान यांची हत्या घडवून सरकार उलथवून टाका, अशा आशयाचा मजकूर या पत्रात आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात विल्सन यांना मुख्य आरोपी बनवण्यात आलेले आहे. आता अमेरिकन कंपनीच्या अहवालाने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रकरण आणि नक्षलवादी कनेक्शनच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरनोन गोन्साल्विस, रोना विल्सन यांच्यासह १५ कार्यकर्त्यांना अटक केली होती. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करण्यात आली व त्यातूनच १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य स्मारक परिसरात हिंसाचार भडकल्याचा आरोप करण्यात आला होता.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times