वाचा:
(वय २७, रा. लोणकर वाडा, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. समीर ढमालेने भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार अजय थोरात यांना मिळाली होती. तलवारीने केक कापल्याचा व्हायरल फोटोही पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक , उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, महेश बामगुडे यांच्या पथकाने समीर ढमालेला गणेश पेठ भागातून अटक केली.
वाचा:
समीर याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. भररस्त्यात साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसांमुळे सामान्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे वाढदिवस साजरा करणाऱ्यांना जरब बसणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times