नवी दिल्ली: दक्षिण प्रशांत महासागरात ७.७ तीव्रतेच्या भूकंपामुळे ऑस्ट्रेलियाच्या हवामान संस्थेने त्सुनामीचा इशारा दिला होता. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाकडून यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्सुनामी येणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. ही आहे. लॉर्ड होवे बेटाला या त्सुनामीचा मोठा धोका असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

प्रशांत महासागरात रिंग ऑफ फायर नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात न्यूझीलंडने भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला होता. यानंतर समुद्राजवळ राहणाऱ्या सर्वांना अॅलर्ट जारी करण्यात आला.

अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्वेचा इशारा

भूकंपाचे केंद्र हे न्यू कॅलेडोनियातील वाओ येथून जवळपास ४१५ किलोमीटर दूर पूर्वेला आहे. भूकंपानंतर पुढील तीन तासांच समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे. या लाटांची उंची ०.३ मीटरपासून ते एक मीटरपर्यंत असू शकते, असं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्वेने म्हटलं आहे.

या देशांना त्सुनामीचा अलर्ट

फिजी, न्यूझीलंड, वानुअतूच्या काही किनाऱ्यांना त्सुनामीचा धोका आहे. तसंच ऑस्ट्रेलिया, कुक आयलंड आणि अमेरिकन समोआसह इतर देशांना छोट्या लाटांचा धोका आहे. भूकांपामुळे अद्याप कुठली जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीए.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here