वाचा:
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर हे पत्नीसोबत राहायचे. पाच महिन्यांपूर्वी अपघातात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तेव्हापासून ते तणावात असायचे. त्यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये वाद व्हायला लागले. काही दिवसांपूर्वी शेखर पत्नीला सोडून भावाकडे राहायला गेले. मंगळवारी रात्री ते घरी परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच त्यांची पत्नी एमआयडीसी स्टेशन मध्ये गेली आणि तिने पतीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने शारदारनगरमध्ये पोहोचले.
वाचा:
शेखर हे बसलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू झाला होता. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच शेखर यांची पत्नी फरार झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. परिसरातील पंकज नावाचा तरुणही बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळले. शेखर यांच्या छातीवर जड वस्तूने प्रहार करण्यात आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांचा मृत्यू नेमका कसा व कशाने झाला, हे स्पष्ट होईल. दरम्यान, पोलिसांनी शेखर यांच्या फरार पत्नीचा शोध सुरू केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times