शेतकरी नेत्यांनी दिला इशाला
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर शेतकरी नेत्यांनी काही नवीन घोषणा केल्या. आता आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असं शेतकरी नेते म्हणाले. येत्या १२ फेब्रुवारीपासून राजस्थानातील सर्व रस्त्यांवरील टोल नाके टोलमुक्त करण्यात येतील. यासह १८ फेब्रुवारीला देशभरात दुपारी १२ ते ४ या वेळेत ‘रेल रोको’ आंदोलन करण्यात येईल. १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ देशभरात कँडल मोर्चे काढले जातील, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनात टोल नाक्यांची तोडफोड आणि त्यांच्यावर कब्जा करणाऱ्यांवर निशाणा साधला. हे कसले आंदोलन कआहे. शेतकऱ्यांचे पवित्र आंदोलन कलंकित करण्याचा हा प्रयत्न नाही का? शेतकरी आंदोलन हे पवित्र आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
शेतकरी आंदोलनात ७७ दिवसांत ७० मृत्यू
सिंघू सीमेवर मंगळवारी आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हरिंदर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते ५० वर्षांचे होते. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. यादरम्यान वेगवेगळ्या कारणांनी ७० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. काहींनी आत्महत्या केली तर काहींचा आजाराने आणि थंडीमुळे मृत्यू झाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times