गडचिरोली जिल्ह्यातील एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याने तिला गर्भधारणा झाली. याप्रकरणी वडसा, देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची आरोग्य तपासणी केली असता तिला २२ आठवडे ९ महिन्यांचा गर्भ असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तेजस जस्टीस फाऊंडेशनच्या विमल रामदास रामटेके यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरकडे तिचा गर्भपात करण्याची विनंती केली. पण, डॉक्टरांनी गर्भ हा २२ आठवडे ९ दिवसांचा असल्याने गर्भपात करण्यास नकार दिला. गर्भपातासाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकाकत्र्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला पीडितेची आरोग्य तपासणी करून गर्भपात केला जाऊ शकतो की नाही, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एन. टी. ग्वालबंशी आणि अॅड. राजेश नायक यांनी काम पाहिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times