नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी ( ) आज लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. यावेळी विरोधी पक्षांनी विशेष करून काँग्रेस खासदारांनी नवीन तीन कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर ( ) बोचरी टीका केली.

काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी कृषी कायद्यांवर मोठ्या चर्चा केल्या. पण कृषी कायद्यांचे फायदेच सांगितले नाही. या उलट कायद्यांविरोधात अफवा आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. कृषी कायद्यांवरून खोटं पसरवण्यात आलं आहे. अफवा पसरवण्यात आल्या. सभागृहात आणि सभागृहाबाहेर हेच करण्यात आलं. पण यातून विरोधकांना कुठलाही फायदा होणार नाही. सभागृहात कृषी कायदे ‘ब्लॅक’ आहेत की ‘व्हाइट’ आहेत यावरच चर्चा झाली. पण दुर्दैवाने विरोधकांनी कायद्यातील तरतूदींवर चर्चा केली नाही, असं पंतप्रधान मोदींनी सुनावलं.

पंतप्रधान मोदींच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ केला. काळे कृषी कायदे मागे घ्या, अशी नारेबाजी सुरू झाली. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे विरोधकांना शांततेचं आवाहन केलं.

‘काँग्रेसची भूमिका लोकसभेत आणि राज्यसभेत वेगवेगळी’

कृषी कायद्यांवर काँग्रेस पक्षातच वेगवेगळे विचार आहेत. पक्षाची लोकसभेतील भूमिका वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेली काँग्रेस कन्फ्युज दिसून येतेय. काँग्रेस स्वतःसाठी काहीही चांगल करू शकत नाही आणि देशातील समस्या सोडवण्याचा विचारही करत नाही. यापेक्षा मोठं दुर्दैवं ते कोणतं? अशी बोचरी टीका PM मोदींनी केली. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी सरकारचा निषेध करत काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.

अधीर रंजन चौधरींना मोदींनी सुनावले

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यानच समज दिली. अधीर रंजन चौधरीजी हे आता अधिक होतंय. प्लीज असं करू नका. मी आपला सन्मान करतो. मध्ये मध्ये टोकू नका. मर्यादेचं उल्लंघन करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी पेक्षा अधिक प्रसिद्धी तुम्हाला मिळेल निश्चित राहा. पण हे योग्य दिसत नाही. तुम्ही असं का करताय? असा सवाल करत PM मोदींनी चौधरींनी टोला लगावला.

चौधरींची पंतप्रधान मोदींवर टीका

आम्ही मोदींनी आम्ही मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही. कायद्यात त्रुटी असतील तर सुधारणा करण्याची तयारी पंतप्रधान मोदींनी दर्शवली. तसंच याचा फायदा काही राज्यांना होईल आणि काहींना फारसा होणार नाही. यामुळे सर्वांचा फायदा नसेल तर असे कायदे का आणता? असा सवाल चौधरी यांनी सभात्याग केल्यानंतर उपस्थित केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी टीएमसीच्या खासदारांनीही लोकसभेतून सभात्याग केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here