म. टा. प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेसतर्फे बुधवारी सोशल मीडिया मोहिमेची मुंबईत सुरुवात करण्यात आली. सोशल मीडिया हा जीवनातील एक अविभाज्य घटक बनला असून, सोशल मीडिया मोहिमेच्या माध्यमातून एका महिन्यात संपूर्ण देशभरात पहिल्या टप्प्यात पाच लाख सभासद म्हणजेच करणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार यांनी बुधवारी येथे दिली आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, सोशल मीडिया डिपार्टमेंट आणि मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया यांच्या संयुक्त सोशल मीडिया मोहिमेचे उद्घाटन जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सोशल मीडिया नॅशनल कोऑर्डिनेटर गौरव पांधी, मुंबई काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष आशीष जोशी, राजेश चतवाल, मुंबई काँग्रेसचे भूषण पाटील, संदेश कोंडविलकर आदी उपस्थित होते.

सोशल मीडिया मोहिमेच्या माध्यमातून एका महिन्यात काँग्रेस देशभरात पाच लाख सोशल मीडिया वॉरियर्स करणार आहे. यातील ५० हजार सभासदांना निरनिराळी पदे देऊन विशिष्ट, महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात सोशल मीडिया मोहीम राबविण्याची संकल्पना आमचे नेते राहुल गांधी यांची आहे, असे ते म्हणाले.

‘ही मोहीम आम्ही दोन दिवसांपूर्वी दिल्लीतून सुरू केली असून, मुंबईतून आज सुरू करीत आहोत. लवकरच प्रत्येक शहरात ते सुरू होईल,’ असे पांधी म्हणाले. सोशल मीडिया मोहिमेमध्ये सभासद होण्यासाठी मिस कॉल, व्हॉट्सअॅप, ईमेल अथवा वेबसाइटवर संपर्क साधू शकता असे आवाहन मुंबई काँग्रेसने केले आहे. मिस्ड कॉल – १८०० १२०० ०००४४, व्हॉट्सअॅप नंबर – ७५७४० ००५२५, ई मेल – smw@inc.in, वेबसाइट – www.incsmw.in किंवा www.incsmwarriors.com येथे संपर्क साधू शकता असे जगताप म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here