नगर: राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना पंतप्रधान भावुक झाले होते. त्यांच्या या ‘अश्रूं’वर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एरव्ही केंद्र सरकारच्या आणि मोदी यांच्याही धोरणांवर टीकाटिपण्णी करणारे राष्ट्रवादीचे आमदार यांनीही यासंबंधी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मोदींच्या या कृतीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ( )

वाचा:

राज्यसभेत मंगळवारी नेते यांच्यासह चार सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. सर्वांबद्दलच मोदी बोलले मात्र, आझाद यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्यासंबंधी जुन्या आठवणींना उजाळा देताना मोदींच्या डोळ्यांतून अश्रूही येताना दिसले. काही क्षण त्यांचा आवाजही फुटत नव्हता. हे पाहून सभागृहात शांतता पसरली होती.

वाचा:

आता या प्रसंगावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अगदी सुरुवातीलाच आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया नोंदविली आहे. मोदींचे जाहीर कौतुकच पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झालेले पाहायला मिळाले. पक्षीय मतभेद असावेत पण मनभेद नसावेत, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेल्या मार्गावरुन मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला.’ असे म्हणत पवार यांनी मोदींचा भावुक फोटोही सोबत जोडला आहे.

वाचा:

काँग्रेस नेत्यांचे मोदींकडून असे कौतुक होत असताना अनेक राजकीय नेते आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. त्यावेळी पवार यांची ही कौतुकाची प्रतिक्रिया आली. विशेष म्हणजे मोदींनी त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांचाही नामोल्लेख करत कौतुक केले होते. रोहित पवार यांनी पूर्वी अनेकदा केंद्र सरकारच्या विविध निर्णयांवर टीका केली आहे. त्यातील त्रुटी दाखून दिल्या आहेत. कधी सरकारकडून अपेक्षा व्यक्त करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तर अनेकदा सरकारच्या चांगल्या निर्णयांचे कौतुकही केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here