म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळावे म्हणून खाऱ्या पाण्याचे करण्याचा उपाय हा शाश्वत नसून, त्याऐवजी पर्जन्यजल संवर्धनाकडे आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोत पुनर्जीवित करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मत पर्यावरण तसेच जलक्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करण्याचा उपाय हा केवळ खर्चिकच नाही, तर ऊर्जा वापरावर अतिरिक्त भार टाकणार आहे. त्यामुळे या पर्यावरणीय परिणामांचा विचार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वाचा:

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष यांनी प्रयोगशाळेमध्ये खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचा पर्याय उपलब्ध असला, तरी तो मुंबईसारख्या शहरामध्ये अंमलात आणण्याची गरज नाही असे स्पष्ट केले. हा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. मुंबईमध्ये एक हेक्टर जमिनीवर दोन कोटी लीटर पाणी पडते. याचे संकलन करून पाण्याची गरज भागवली जाणे अपेक्षित आहे, असा विचार त्यांनी मांडला. मुंबईमध्ये अधिकाधिक नागरीकरण करायचे, लोकसंख्या वाढवायची आणि मग त्या लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधा अधिक पैसे खर्च करून वाढवायच्या हे अपेक्षित नाही. इस्रायलसारख्या देशाने ही गोष्ट करणे आणि भारतात ही गोष्ट करणे यात नैसर्गिक फरक आहे. आपल्या देशात नैसर्गिकरित्या पाणी आणि पाऊस भरपूर पडतो. याचा योग्य वापर होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. यामध्ये खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करण्यासाठी लागणारी ऊर्जा, त्यासाठी लागणारे इंधन, नैसर्गिक स्रोतांवर येणारा ताण या सगळ्याचे समीकरण मांडायला हवेत, असे मत त्यांनी मांडले. तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे म्हणून अन्न-पाणी कृत्रिमरित्या तयार करणे ही भारताची गरज नाही. पाणी क्षारविरहित करण्याच्या प्रक्रियेऐवजी नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करावे, असे मत त्यांनी मांडले. हे सामाजिक हिताचेही नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘सूक्ष्म प्लास्टिक कणांचाही विचार व्हावा’

‘वॉटर एन्वायरोन्स’च्या किमया केळुसकर यांनी क्षारविरहिकरणाची प्रक्रिया वाळवंटी प्रदेशांसाठी अधिक योग्य असल्याचे मत मांडले. भारतामध्ये भूजलस्तर, भूगर्भातील पाण्याचे साठे यांची नैसर्गिक व्यवस्था अस्तित्वात आहेत. त्यामुळे पाण्याचे संचयन आणि संवर्धन या अधिक योग्य पद्धती आहेत. क्षारविरहिकरणामुळे ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. त्यामुळे हा शाश्वत पर्याय नाही. यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मिसळलेले आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी शुद्धीकरण करताना या सूक्ष्म स्तरावरील प्लास्टिक कणांचाही विचार व्हायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here