नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यासाठी त्या ” घेऊन संसदेत दाखल झाल्या आहेत. मागील वर्षाची वहीखात्याची परंपरा त्यांनी यंदाही कायम राखल्याचं त्यावरून स्पष्ट झालं आहे.

वाचा:

सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री त्यासंबंधीची कागदपत्रे एखाद्या ब्रीफकेसमधून संसदेत आणतात. मागील वर्षीपर्यंत ही प्रथा सुरू होती. मात्र, सीतारामन यांनी ती मोडीत काढली आहे. आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आपल्या टीमसह संसदेत आलेल्या सीतारामन यांच्या हातात ब्रीफकेसऐवजी ‘वहीखाते’ होते. लाल कपड्यात बांधलेल्या या वहीखात्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

वाचा:

खरंतर वहीखात्याची ही परंपरा सीतारामन यांनी मागील वर्षी सुरू केली होती. मागील वर्षी त्यांनी सादर केलेला २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प होता. त्यावेळी त्या वहीखाते घेऊन संसदेत आल्या होत्या. ब्रीफकेस ऐवजी वहीखाते आणण्याचं कारणही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. ‘ब्रीफकेस किंवा सूटकेस मला आवडत नाही. ती इंग्रजांच्या काळातली पद्धत आहे. ती आवडत नसल्यानं माझ्या मामीनं मला लाल कपड्याचं दफ्तर बनवून दिलं. पूजाअर्चा करून त्यांनी ते मला सोपवलं. ही घरची पिशवी वाटू नये आणि तिला सरकारी ओळख मिळावी म्हणून त्यावर अशोक स्तंभाचं चिन्ह लावलं,’ असं त्या म्हणाल्या होत्या. वहीखात्याची ती परंपरा त्यांनी यंदाही सुरू ठेवली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here