म. टा. खास प्रतिनिधी,

राज्यपाल यांनी राज्य सरकारच्या बाजूने बोलावे, असे संकेत आहेत. तरीही त्यांच्याकडून राजकीय वक्तव्ये केली जात आहेत. वारंवार होणारी राजकीय वक्तव्ये चुकीची आहेत. राज्यपाल चांगल्या स्वभावाचे, परंतु संघाच्या विचारसणीमुळे त्यांचा नाइलाज असेल, असा टोला आदिवासी विकासमंत्री यांनी कोश्यारींना लगावला. राज्यपालांना मी सल्ला देऊ शकत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कायद्यानुसार प्रत्येकाने मर्यादेत वागायला हवे असे सांगत, राज्यघटनेचा भंग करणे घातक असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. राज्यातील कुपोषण हा सामाजिक विषय असून, अल्पवयीन विवाह, माता ही गंभीर प्रकरणे असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, अशी माहितीही त्यांनी दिली.

वाचा:

उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याची बैठक झाल्यानंतर अॅड. पाडवी पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांनी आदिवासी भागातील दुरवस्थेसह शाळांवर गेल्या आठवड्यात टीका केल्याबद्दल विचारले असता पाडवी यांनी राज्यपालांच्या टीकेला उत्तर दिले. राज्यघटनेत सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली आहे. त्यानुसार सर्वांचे वर्तन असावे असे सांगत, कायद्यानुसार काम करण्याचा सल्ला त्यांनी राज्यपालांना दिला. मला माझा शपथविधीचा प्रसंग अजून आठवतो. त्या वेळी राज्यपालांनी नियमाचा दाखला दिला होता. त्यामुळे आताही त्यांच्याकडून तीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिकोंबडी ९० रुपयांची मदत

नवापूरमधील बर्ड फ्लूची स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत, नऊ लाख २५ कोंबड्यांचे कलिंगचे काम सुरू असल्याचे पाडवी यांनी सांगितले. बर्ड फ्लूमुळे स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना भरपाई म्हणून प्रतिकोंबडी ९० रुपये, तर प्रतिअंडी तीन रुपये याप्रमाणे सरकारकडून मदत दिली जाणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले. नंदुरबारमध्ये गावठी कोंबड्यांमध्ये कुठेही बर्ड फ्लूची लक्षणे नसल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

कुपोषण रोखण्यासाठी तेलंगणा पॅटर्न

कुपोषण हा सामाजिक विषय असून, तो योग्य पद्धतीने हाताळण्याचे काम आम्ही करीत असल्याचे पाडवी यांनी सांगितले. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात भगरच्या आहारामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. तोच पॅटर्न आम्ही राज्यातही सुरू करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात बालमाता प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाणार असून, असे प्रकार आढळल्यास संबंधितावर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here