कोल्हापूरः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारनं विमान परवानगी नाकारल्यानं राजकारण तापलं आहे. भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्यपाल कोश्यारी आज उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पाहणीसाठी जाणार होती. यावेळी ते सरकारच्या विमानानं जाणार होते. मात्र, त्यांना प्रवासाची परवानगी नसल्यानं विमानातून उतरावं लागलं होतं. यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

राज्यात सूड भावनेचा अतिरेक झाला असून संविधान गुंडाळून ठेवून सरकार काम करत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसंच, राज्यपालांना विमानात परवानगी नाकारून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला, आघाडी सरकारचा हा संविधान नाकारण्याचा परमोच्च बिंदू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

वाचाः

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचं म्हटलं होतं, यावरुनही दरेकरांनी सरकारला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात समन्वय नसल्याचे आणि एकमेकांनी घेतलेले निर्णय एकमेकांना माहीत नसल्याचे स्पष्ट होते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची नावे देऊन अनेक महिने झाले तरी त्याला राज्यपाल मान्यता देत नाहीत याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले, संविधानात काही गोष्टी तपासून पहावे लागतात. संविधानानुसार या नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे, योग्य वेळी याबाबत राज्यपाल निर्णय घेतील, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

वाचाः

पश्चिम महाराष्ट्रातील चौदा लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करण्याचा जो निर्णय सरकारने घेतला आहे, तो अतिशय जुलमी असल्याचा आरोप करून दरेकर म्हणाले, बिल्डरांना प्रीमियम माफ केला, दारू दुकानाचा परवाना फी माफ केली. ज्यांच्याकडून पैसे मिळतात त्यांना माफी दिली जाते आणि मग सर्वसामान्य लोकांकडून विज बिल कशासाठी वसूल केली जात आहे असा सवाल करून ते म्हणाले, हे बिल माफ करुन त्यांना दिलासा देणे अत्यावश्यक आहे. याविरोधात जनता आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची किंमत सरकारला नक्की मोजावी लागेल असा, इशाराही त्यांनी दिला.

वाचाः
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नंतर राज्य सरकार मधील आणखी एका मंत्र्यांवर तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यावर जो आरोप झाला आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले, पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, नैतिकता पाळलीच पाहिजे. नैतिकता न पाळणाऱ्यावर कारवाई केली जाईल. फक्त याबाबत चौकशी करून सत्य बाहेर आल्यानंतरच कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here