म. टा. प्रतिनिधी । पुणे

राज्यपाल यांना सरकारी विमानानं प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘इतका ‘इगो’ असलेले सरकार यापूर्वी पाहिले नाही. सरकारला इतका प्रचंड ‘इगो’ कशाचा आहे,’ असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. ( attacks Government Over Governor Controversy)

वाचा:

पुणे महापालिकेत आढावा बैठकीसाठी फडणवीस दाखल झाले असून बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. सरकारी विमानानं प्रवास करण्यावरून राज्यपालांसोबत घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मी ऐकलेला हा सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर आपल्या पद्धतीप्रमाणे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र द्यावे लागते. त्यानुसार, प्रशासन पुढील आदेश काढते. याबाबत मी माहिती घेतली असून सामान्य प्रशासन विभागास तसे पत्र कालच देण्यात आले होते. त्यानंतर, सामान्य प्रशासन विभागाने फाइल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर केली होती. असे असताना राज्यपाल पोहोचल्यानंतर त्यांना विमानातून उतरविणे हे योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.

वाचा:

‘हे अत्यंत चुकीचं असून कुठल्या पदाचा आपण अपमान करत आहोत? राज्यपाल ही केवळ व्यक्ती नाही. व्यक्ती येते, व्यक्ती जाते. त्यांचा असा अपमान करणं योग्य नाही. राज्याच्या इतिहासात इतकं इगो असलेलं सरकार यापूर्वी पाहिलं नाही. इतका प्रचंड इगो कशाचा आहे? मला वाटतं हा पोरखेळ सुरू असून हे निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले.

तात्काळ कारवाई करा!

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राज्यातील एका मंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात येत आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले, ‘पुणे पोलिसांनी या घटनेबाबत तत्काळ कारवाई करून सत्य समोर आणलं पाहिजे. ते लपविण्याचं काहीच कारण नाही.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here