पहूर येथील महेश छाजेडनगरात भागवत गायकवाड त्यांच्या पत्नी भारतीबाई यांच्यासह राहतात. काल मध्यरात्री भारतीबाई या शौचावरून घरात प्रवेश करीत असताना घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला. चोरट्यांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता.
घरात प्रवेश केल्यानंतर भारतीबाई गायकवाड यांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दागिने व पैशांची मागणी केली. महिलेने घाबरून किचन ओट्याखाली ठेवलेला डबा काढून दिला. यामधील तीन ग्रॅमचे साधारण १२ हजार किमतीचे डोरले, २४ हजार किंमतीचे सहा ग्रॅमचे पदक, १६ हजार रुपयांचे चार ग्रॅम वजनाचे वेल, ४० हजारांचा दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस, दोन ग्रॅम वजनाचे आठ हजार किंमतीच्या दोन नथ असे एक लाख १६ हजार वजनाचे दागिने डब्यातून काढत चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाचोरा विभागाचे डीवाएसपी भारत काकडे यांनी पाहणी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times