मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमानप्रवासावरुन राज्यात राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यामागे प्रशासकीय कारण असल्याचं म्हटलं आहे. तर, भाजप नेत्यांनी यावर ठाकरे सरकार सूड भावनेतून वागत असल्याचा,आरोप केलाआहे. अखेर या सगळ्या प्रकरणावर राजभवानाकडून स्पष्टीकरण आलं आहे. तसंच, नेमकं काय घडलं? याचा सविस्तर खुलासाही करण्यात आला आहे.

राज्यपाल कोश्यारी आज उत्तराखंड दौऱ्यावर जाणार होते त्यासाठी ते सरकारच्या विमानानं जाणार होते. मात्र, त्यांना प्रवासाची परवानगी नसल्यानं विमानातून उतरावं लागलं असल्याचं वृत्त होतं. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तांत्रिक अडचणींमुळं परवानगी नाकारली असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, आज राजभवनानं जारी केलेल्या पत्रकानुसार राज्यपालांनी दोन आठवडे आधीच सरकारी विमानातून प्रवासाची परवानगी मागितली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

वाचाः

राजभवनाकडून अधिकृत पत्रक जारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शुक्रवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी मसूरी येथे एका कार्यक्रमासाठी जायचं होतं.

या कार्यक्रमाला जाण्यासाठी राज्यपाल ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचले होते.

मसूरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सचिवालयानं २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विमान प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवण्यात आलं होतं.

गुरुवारी राज्यपाल ठरलेल्या वेळेनुसार विमानतळावर पोहोचले आणि विमानात बसले देखील. मात्र, तेव्हा राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवासासाठी परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं.

यानंतर राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार खासगी विमानातून त्यांनी देहराडूनला गाठले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here