मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं मुंबई मिशनची मोहिम हाती घेतली आहे. तर, मनसेनंही निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. राज्यात नवीन समीकरण निर्माण झाल्यानं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा अटीतटीची होणार असल्याचं चित्र आहे. चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी अमराठी नको, ही भूमिका मनसेनं बदलावी, अशी एकप्रकारे अटच घातली आहे.
वाचाः
‘अमराठी नको, ही भूमिका त्यांनी बदलावी. मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे मी यापूर्वीच म्हटले होतं. मात्र, मनसेच्या एका नेत्यानं आम्ही तुम्हाला विचारायला आलो का, असं म्हटलं होतं, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली आहे. तसंच, प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. मनसेमध्ये अमराठी बांधव आले, तर चांगली गोष्ट आहे. त्यांच्या हिंदुत्वाबाबत शंका नाही, अमराठी नको, ही भूमिका त्यांनी बदलावी असे आमचे म्हणणे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः
‘शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुजराती आणि अमराठी बांधवांविषयीचे प्रेम हे पुतना मावशीच्या प्रेमासारखे आहे. महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने त्यांना ही मते हवी आहेत,’ अशी जहरी टीकाही त्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times