‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या सेटवर अनेक मजेशीर किस्से घडले आहे. पण असा एक किस्सा घडला जो करण जोहर कधीच विसरू शकणार नाही. या चित्रपट सलमान खान पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत होता. यातील त्याच्या व्यक्तीरेखेचं नाव अमन होतं. या चित्रपटात सलमान खानसोबत एक वेडिंग सीन शूट होणार होता. ज्यावर सलमान करणला असं काही बोलला की करण सेटवरच रडायला लागला.
चित्रपटातील लग्नाच्या सीनसाठी सलमाननं सूट घालावा असं करणला वाटत होतं. पण सलमाननं असं करण्यास नकार दिला आणि तो करणला म्हणाला, ‘माझ्याकडे यापेक्षा जास्त चांगली कल्पना आहे. मी लग्नात टॉर्न जीन्स आणि टी-शर्ट घालतो. आतापर्यंत असं कधीच घडलं नाहीये त्यामुळे लोकांना हे पाहायला जास्त आवडेल.’ सलमानचं असं बोलणं ऐकल्यावर करणला धक्का बसाल. त्याला सुरुवातीला वाटलं की, सलमान मस्करी करत आहे.
काही वेळानं सलमान खानला करणनं सांगितलं की, तुला तो सूट घालावाच लागेल कारण चित्रपटाच्या हिशोबनं जीन्स घालणं चांगलं वाटणार नाही. पण सलमाननं असं करण्यास नकार दिला. करण जोहर सलमानला ही गोष्ट समजवून थकला होता. पण सलमान काही ऐकून घेत नव्हता. तेव्हा करणला सेटवरच रडू कोसळलं. तो रडत रडत सलमानला म्हणाला, ‘कृपया असं करू नको हा माझा पहिलाच चित्रपट आहे.’ करण अक्षरशः गुडघ्यावर बसून सलमानला सूट कसा चांगला वाटेल हे सांगत होता.
करणला असं अचानक रडू लागलेलं पाहून सलमान घाबरला आणि करणला म्हणाला, ‘ठिक आहे मी सूट घालतो… तू स्वतःला त्रास करून घेऊ नको… रडू नको’ हा किस्सा करणनं स्वतःच एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणाला, ‘मला माहीत होतं की, शेवटी सलमान माझं ऐकेल कारण तो कधीच कोणासोबत वाईट वागत नाही. तो सर्वांना मदत करतो. त्यावेळी हे सर्व खूप विचित्र होतं. पण खूप मजेशीर होतं.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times