१९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तारखेनुसारची शिवजयंती सरकारी पातळीवर आणि अनेक संस्था, संघटनांकडून साजरी करण्यात येते. राज्य सरकारने करोनाविषयक उपाययोजनांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शिवजयंतीवरही निर्बंध आले आहेत. यासंबंधी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारच्या याच निर्णयावर भाजपचे नेते राम कदम यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचं सरकार शिवजयंतीच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दहा पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास कारवाई करणार. महाराष्ट्र सरकारनं हा तुघलकी निर्णय लगेच मागे घ्यावा. एल्गार परिषद, किसान मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभांना परवानगी दिली जाते. रेल्वे, बसमधील गर्दी यांना चालते. पण हिंदू सण यांना का खटकतात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही धुमधडाक्यात साजरी करणारच, असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
वाचाः
अतुल भातखळकर यांनीही सरकारच्या या निर्णयावर टोला लगावला आहे. बार, रेस्टॉरंट, हॉटेल, पब, नाइट लाइफची चिंता करणाऱ्या राज्य सरकारची शिवजयंतीवर बंधने, असं ट्विट भातळखकर यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times