चेन्नई, : विराट कोहलीच्या नेतृत्वावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. विराट कोहलीचे नेतृत्व समजणे हे अवघड असल्याचे मत मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि नदीम यांच्याबाबतही मांजरेकर यांनी भाष्य केले आहे.

मांजरेकर म्हणाले की, ” पहिल्या सामन्यात भातीय संघाच्या रणनितीमध्ये काही चुका पाहायला मिळाल्या. रणनितीचा विचार केला तर भारतापेक्षा इंग्लंडचा संघ सरस असल्याचे पाहायला मिळाले होते. भारतीय संघ पहिल्या सामन्यात झालेल्या चुका दुसऱ्या सामन्यात दुरुस्त करतील, अशी आशा आहे. रण विराट कोहलीला समजून घेणे थोडे अवघड आहे. विराट कोहली जी रणनिती आखतो किंवा ज्यापद्धतीने तो संघाची निवड करतो, या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत.”

मांजरेकर यांनी पुढे सांगितले की, ” पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. सुंदरने सुरुवातीपासूनच चुकीच्या लाइनवर गोलंदाजी करायला सुरुवात केली. सुंदरने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकायला हवेत, जर सुंदरने असं केलं तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद करु शकतो. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात कुलदीप यादवला संधी न देता नदीमला खेळवण्यात आले. पण मला यामध्ये कुठेच चुकीचे वाटत नाही. कारण नदीमसारख्या गोलंदाजासाठी ही खेळपट्टी पोषक होती, त्यामुळे त्याला संधी दिली असावी. पण नदीमला संधी मिळूनही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.”

अजिंक्य रहाणेबद्दल मांजरेकर काय म्हणाले होते, पाहा…अजिंक्यबाबत संजय मांजरेकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” मेलबर्न येथील कसोटी सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले होते. त्यानंतर अजिंक्यच्या नावावर २७*, २२, ४, ३७, २४, १ आणि ० अशा धावा केल्या आहेत. शतकानंतर जे क्लासिक खेळाडू असतात ते त्यांचा फॉर्म कायम ठेवतात आणि अन्य खेळाडूंचे दडपणही दूर करण्याचा प्रयत्न करतात.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here