मुंबई : सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नावाचा ट्रेंड तुफान चालत आहे. ऑस्ट्रेलियामधील एक सुंदर अविवाहित अँकर असलेली क्लो अमांडा बेली ही अचानक प्रसिद्धीच्या झोताता आली आहे. पण बेलीला भाभी या नावाच अर्थ माहिती नव्हता. हा प्रश्न तिने ट्विटरवर विचारला आणि या प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले आहे.
बेलीने मला भाभी का म्हणत आहे, असा प्रश्न विचारल्यावर एका चाहत्याने तिला उत्तर दिले आहे. या चाहत्याने पंतचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांची पसंती, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बेलीने पंत मला आवडतो, असे म्हटले होते. त्याचबरोबर आतापर्यंत केलेल्या बऱ्याच ट्विटमध्ये तिने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times