मुंबई: राज्यात आज २५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज दिवसभरात ३ हजार २९७ नवीन रुग्णांची भर पडली असून ६ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. ( )

वाचा:
राज्यातील करोनाचा आलेख वेगाने खाली येत आहे. आज नवीन बाधितांचा आकडा तीन हजारांवर पोहचला असला तरी त्याचवेळी सहा हजारावर रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात करोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या जवळ पोहचला असून हेच सातत्य राहिल्यास येत्या काही आठवड्यांत स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. राज्यातील करोना मृत्यूंचा दैनंदिन आकडा कमी झाला असून आज २५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१ हजार ४१५ रुग्णांना करोनाच्या विळख्यात सापडून प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.५ टक्के इतका खाली आला आहे.

वाचा:

आज राज्यात ३ हजार २९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ७० हजार ५३ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५१ लाख ६३ हजार ७८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ५२ हजार ९०५ (१३.५४ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६६ हजार ७८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३० हजार २६५ इतकी आहे. यात वेगाने घट होताना दिसत आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे , आणि या तिन्ही जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा खूप खाली आला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ५८७, ठाणे जिल्ह्यात ४ हजार ३१७ आणि मुंबईत सध्या ४ हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here