पुणे: देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले असल्याने कारखान्यांनी हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास आणि खुल्या बाजारात दरमहा विक्री करायच्या साखरेच्या कोट्याच्या मर्यादेचे उल्लंघन केले गेल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त यांनी दिला आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित साखर कारखान्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ( Latest News )

वाचा:

साखर आयुक्त गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले असल्याने योग पद्धतीने व्यवस्थापन व्हावे, साखरेची देशांतर्गत किंमत स्थिर रहावी आणि उत्पादकांना रास्त व किफायतशीर किमतीप्रमाणे () कारखान्यांकडून दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने साखर विक्रीची ३१०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. या हमीभावापेक्षा कमी दराने साखर विक्री करण्यात येऊ नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

बाजारातील साखरेची मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधण्यासाठी खुल्या बाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी, यासाठी साखर विक्रीचा दरमहा कोटा ठरवून देण्यात आला आहे. कारखान्यांनी या मर्यादांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित कारखान्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here