कोलकाताः दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान २६ जानेवारीला ( ) ( ) झाला होता. लाल किल्ल्यावरील हिंसाचारावर आता केंद्रीय गृहमंत्री ( ) यांची भूमिका उघड आली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मोठा संयम दाखवला आहे. आम्हाला शेतकर्‍यांचं आंदोलन रक्तरंजित होऊ, असा आमचा प्रयत्न होता. ट्रॅक्टर परेडबाबत आम्ही शेतकरी नेत्यांशी पूर्ण चर्चा केली होती. पण त्यांनी नंतर शब्द मोडला, असं अमित शहा म्हणाले.

लाल किल्ल्यावर आंदोलक कसे चढले? असा प्रश्न इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आलेल्या अमित शहांना विचारण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी खूप संयम राखला आणि आंदोलकांवर गोळीबार केला नाही. त्यांच्यावर लाठीणारासह दुसरे उपाय करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. आणि अडीच तासाच्या आता संपूर्ण दिल्ली रिकामी झाली. जे लोक लाल किल्ल्यावर चढले ते शेतकरी असू शकत नाहीत असं प्रत्येक जण म्हणतोय, असं अमित शहांनी सांगितलं.

‘सीएए कायदा लागू होणारच’

सीएए हा देशाच्या संसदेने बनवलेला कायदा आहे. याची अंमलबजावणी करावीच लागेल आणि निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळेल. ममता सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. पश्चिम बंगालमध्ये अतिशय वेगाने घुसखोरी होत आहेत. पण ममता बॅनर्जी त्या रोखू शकल्या नाहीत, असं अमित शहांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसातील शेकडो जवान जखमी

दिल्लीत २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा झाला. यावेळी लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी हिसांचार झाला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने शेकडो दिल्ली पोलिस कर्मचारी जखमी झाले. हिंसाचाराच्या या घटनेच्या निषेधार्थ काही शेतकरी संघटनांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. लाल किल्ल्याची घटना गंभीरपणे घेत दिल्ली पोलिसांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्यासह अनेकांना अटक केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here