राहुल गांधी हनुमानगढ, श्रीगंगानगर, सूरतगड, नागौर आणि मकराना येथे सभा घेतील. रूपानगढमध्ये ते ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील. राहुल किशनगढमधील सुरसुरा येथे पूजा करतील. दुसरीकडे पंजाब-हरयाणा येथील शेतकरी सिंघू सीमेवर गेल्या ७८ दिवसांपासून नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांनी दीर्घ कालीन आंदोलनाची बरीच तयारी केलीय. येत्या काही दिवसांत इतर राज्यांना आंदोलनाशी जोडण्यासाठी देशभरात महापंचायतींचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा केली आहे.
शेतकरी झाले सतर्क
दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी सतर्क झाले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सुरक्षा आणि बाहेरच्या लोकांना वेगळे ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. जवळपास १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ६०० स्वयंसेवक गस्त घालण्यात गुंतले आहेत. त्यांच्यावर रात्रीची वाहतूक आणि देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच प्रत्येकाला ओळखीसाठी ग्रीन जॅकेट आणि ओळखपत्रही देण्यात आले आहे.
भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन आणि उन्हासाठी AC
सर्व शेतकरी नेत्यांची भाषणे उपस्थित ऐकू शकतील यासाठी १० वेगवेगळ्या ठिकाणी मोठे एलसीडी स्क्रीन बसवेला जात आहे. ७०० ते ८०० मीटर अंतरावर लावली जात आहेत. त्याचबरोबर उन्हामुळे पंखे आणि एसीचीही व्यवस्था केली जात आहे. शेतकरी नेते १८ फेब्रुवारीला रेल रोको आंदोलन करणार आहेत. तसंच राजस्थानमध्ये १२ फेब्रुवारीपासून टोलनाके खुले करण्याचा इशारा दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times