आपल्या भाषणादरम्यान सीतारामन यांनी केवळ ऐकवलीच असं नाही. तर, हिंदीमध्ये तिचा अर्थ सांगितला. हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसे… हमारा वतन दल झील में खिलते हुए कमल जैसे… नौजवानों के गर्म खून जैसा… मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन… असं सांगत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली. भारत हा सर्वांचा आहे, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसंच, कृषी क्षेत्राला उभारी देण्याबाबतच्या घोषणा करण्याआधी त्यांनी एक तामीळ म्हण सुद्धा ऐकवली. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या घोषणेचा पुनरुच्चार करताना अर्थव्यवस्थेच्या सर्व आघाड्यांवर सुधारणा घडवून आणण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, असं त्यांनी सांगितलं. हा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सीतारामन यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
>> ‘हा अर्थसंकल्प तीन प्रमुख स्तंभावर आधारलेला आहे. डिजिटल क्रांती, राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि सामाजिक सुरक्षेत वाढ करणं हा अर्थसंकल्पाचा उद्देश आहे.
>> डिजिटल कारभाराच्या माध्यमातून सेवा अखंड उपलब्धता
>> राष्ट्रीय पायाभूत सोयीसुविधांच्या माध्यमातून आपल्याला लोकांचं जीवनमान उंचावायचं आहे.
>> आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून जोखीम करण्यावर भर द्यायचा आहे.
>> पेन्शन आणि विमा कवचाची कक्षा वाढवून सामाजिक सुरक्षेचा विस्तार करायचा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times