वाचा:
भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, सावनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सदस्यांची पळवापळवी आणि देवाण-घेवाण यामुळे भाजपला मोठा फटका बसला. राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा हा मतदारसंघ आहे. भाजपने थेट कुणाचेही नाव घेता केदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य काँग्रेसचे आहेत. पंचायत समित्यांमध्येसुद्धा काँग्रेसचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पॅनलला मोठे यश प्राप्त झाले आहे. अशा ठिकाणी काँग्रेस इतर सदस्यांची पळवापळवी का करेल? केवळ मंत्र्यांचा मतदारसंघ आहे म्हणून बिनबुडाचे आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. जिल्ह्यातील खचलेल्या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठीचीही केवीलवाणी धडपड आहे.’
वाचा:
नेमका कुणाचा दावा खरा?
जिल्ह्यात काँग्रेसने ८३ तर भाजपने ७३ ठिकाणी आपलाच सरपंच बसल्याचे दावे केलेत. सदस्य निवडणुकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसने ३० ग्रामपंचायतींवर दावा केला होता. शिवसेनेने दोन तर मनसे, आम आदमी पक्ष व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. या सगळ्यांनी केलेले दावे खरे मानायचे झाल्यास जिल्ह्यात १९१ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या असल्या पाहिजेत. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यात मुळात १२९ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणुका झाल्यात. त्यामुळे हे सर्व दावे केवळ राजकीय कुरघोडीसाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times