म. टा. प्रतिनिधी,

विरोधी पक्षनेते यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभाराचे कौतुक करतानाच पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप दिली आहे. आगामी महापालिका निवडणूक स्व-बळावरच लढण्याचा नाराही त्यांनी या वेळी देऊन आगामी निवडणुकांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ( on )

महापालिकेने मिळकतकरासाठी लागू केलेली अभय योजना, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावरील प्रकल्प, सहा मीटर रुंदीचे रस्त्यांचे रुंदीकरण या महत्त्वपूर्ण निर्णयांचेही समर्थन फडणवीसांनी केले आहे.

वाचा:

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निमंत्रित केल्यानुसार आपण गुरुवारी महापालिकेतील प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेतल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना पुण्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यातील निवडक प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. महापालिकेचे पदाधिकारी उत्तम काम करत असून, प्रकल्पांची कामेही सुरू आहेत. सर्वच महापालिकांनी वेग घेतला पाहिजे. मात्र, महापालिकांत स्थानिक स्तरांवरील समस्याही अधिक असतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

वाचा:

करोनाच्या पार्श्वभूमीवर वेळीच भूमिका घेऊन स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मिळकतकर भरण्यासाठी ‘अभय योजना’ आणली. त्यामुळे महापालिकेला ४९२ कोटी रुपये त्यातून मिळाले आहेत. ही योजना आमच्या ताब्यातील इतर महापालिकांत राबवावी, अशी सूचना आपण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. महापालिका राबवित असलेल्या ‘पीपीपी’ तत्त्वावरील प्रकल्प, सहा मीटर रुंदीचे रस्त्यांचे रुंदीकरण या निर्णयांचेही त्यांनी समर्थन केले आहे.

‘स्वतंत्र महापालिका हवी; पण…’
महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वास्तविक संलग्न परिसरात नवीन नगरपालिका तयार करणे अधिक संयुक्तिक असते. ‘नागरीकरणाचा वेग रोखण्यासाठी छोटी शहरे (अर्बन सेंटर्स) उपयुक्त असतात. मात्र, सरकारने २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने नवीन महापालिका तयार करण्याच्या निर्णयाची अधिक चर्चा करण्याची गरज नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

या योजनांवर झाली चर्चा

समान पाणीपुरवठा, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, मल:निसारण प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, चांदणी चौक, पंतप्रधान आवास योजना, मेट्रो, पीएमपीएमएल, एचसीएमटीआर, एसआरए, वैद्यकीय महाविद्यालय, पीपीपी योजना, यांसह ‘स्मार्ट सिटी’च्या कारभाराबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीसाठी महापौर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी, आमदार उपस्थित होते.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here