महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या, म्हणजेच ”च्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाचा:
बांधकाम उद्योगावर नियंत्रण ठेवणारे ‘महारेरा’ हे महत्त्वाचे प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त होते. या पदासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी स्पर्धेत होते. या पदावर यांची नियुक्ती झाली आहे. मेहता यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त, वीज महावितरण आदी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
वाचा:
जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशनची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पदावर यू. पी. एस मदान हे होते. ते निवृत्त झाले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times