‘राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या खातेवाटपाच्या प्रश्नावर वावड्या उडविण्यात येत आहेत. मात्र, खातेवाटपाबद्दल आमच्यात थोडीशीच काय, तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना लगावला. ‘ईव्हीएम’ मशीनबद्दलही त्यांनी आपले परखड मत मांडले. ()
वाचा:
स्थानिक स्वराज संस्था व राज्यातील निवडणुका मतदानपत्रिकेने घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नव्या कायदा करण्याचे सूतोवाच तत्कालीन विधानसभा अध्यक्ष या नात्याने नाना पटोले यांनी केले होते. याकडे लक्ष वेधता ते आता एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मुळात याबाबत अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा असतो. ईव्हीएम मशीन उत्तम असून, अचूक मतदानासाठी हीच मशीन चांगली आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाम मत व्यक्त केले. शिवाय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाचा:
राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटप हा सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा अधिकार आहे. तिन्ही नेते यासंदर्भातील निर्णय घेतील. हा निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असेल, असे ते म्हणाले. राज्य पातळीवर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, , एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत बातमी आलेली नाही, या बातम्या मीडियातील आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
वाचा:
राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांना भेटल्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याची टीका मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती, याकडे लक्ष वेधता अजित पवार म्हणाले की, या गोष्टीत तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावे घेतात, त्यातून प्रसिद्धी मिळविण्याचा काहींचा उद्योग असतो.
‘राज्यपाल प्रकरणाबाबत माहिती नाही’
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उत्तराखंडमधील डेहराडून येथे जाण्यासाठी सरकारी विमान नाकारण्यात आले. याबाबत त्यांनी आपणास काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मंत्रालयात जाऊन पूर्ण माहिती घेतो, मग पुन्हा तुमच्याशी बोलतो, असे मोघम उत्तर पवार यांनी दिले. इतर काही प्रश्नांवर उत्तरे दिल्यानंतर एका पत्रकाराने राज्यपाल प्रकरणावरच प्रश्न केल्यानंतर ते वैतागले. मला याबाबत काहीच माहीत नाही, असे अजित पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक न होता बिनविरोध निवड व्हावी, यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची निवड बिनविरोध झाली होती. त्याचपद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीत याबाबद्दलची निश्चितता झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही चर्चा करून अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यावा, अशी विनंती केली जाणार आहे, असे ते म्हणाले. ज्या शाळांनी अनुदान संबंधीचे निकष पूर्ण केले आहेत. त्यांना अनुदान दिले जाणार आहे. गेल्या २२ दिवसांपासून अनुदानित शाळेतील शिक्षकांचे आंदोलन सुरू असून, त्यांना लवकर दिलासा दिला जाईल, असे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times