पुणे: गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण भाजपचे विधान परिषदेतील आमदार यांच्या पुढाकारानं एक दिवस आधीच करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या हस्ते शनिवारी या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. याचं कारण सांगताना पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.

वाचा:

जेजुरी संस्थानच्या वतीनं जेजुरी गडावरील पायरी मार्गावर अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सोहळा उद्या दुपारी शरद पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र, पडळकर यांनी काही कार्यकर्त्यांसह आज पहाटेच हा सोहळा उरकून टाकला. व्हिडिओ ट्वीट करून त्यांनी याची माहिती दिली आहे. ‘फटाक्यांच्या आतषबाजीत, हालग्यांच्या कडकडाटात, खंडेरायाच्या साक्षीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. पडळकर म्हणाले, ‘शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं हे खरं आहे. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसानं अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये, अनावरण करू नये, अशी अनेकांची भावना होती. त्यामुळं आम्हीच हा सोहळा पार पाडला. अहिल्यादेवी यांचं काम अखंड भारतात आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचं काम आहे. शरद पवार यांची प्रतिमा बरोबर उलटी आहे. अहिल्यादेवी bप्रजाहित दक्ष होत्या. पवार हे नेमके प्रजेच्या विरोधी आहेत. वाईट प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणं म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे. म्हणून आज आम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलंय.’

‘अहिल्यादेवी आणि आपल्या विचारात तफावत आहे हे शरद पवार यांनी समजून घ्यावं आणि यापुढच्या काळात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावताना हजारदा विचार करावा,’ असंही पडळकर यांनी सांगितलं.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here