मुंबई- राज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा यांचं ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. निधनानंतर त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक किस्सा सलमान खानशी संबंधित आहे. एकेकाळी राजीव कपूर आणि यांच्यात भांडण चर्चेत आले होते.

‘हीना’ आणि ‘सनम बेवफा’ चित्रीकरणावेळची आहे घटना

हा किस्सा’हिना’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळचा आहे. त्यावेळी सलमान ‘सनम बेवफा’ सिनेमाचं चित्रीकरणही करत होता. एकाच ठिकाणी दोन सिनेमांचं चित्रीकरण सुरु होतं. वृत्तानुसार, दोन्ही सिनेमांची टीमही एकाट हॉटेलमध्ये थांबले होते. पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियार त्या काळात फार चर्चेत होती.

राजीव कपूर सलमान आणि जेबाच्या डिनरला जाण्याने रागावले होते

रिपोर्टनुसार सलमान झेबाला नेहमी फुलं पाठवायचा. एक दिवस त्याने जेबाला जेवणाचं आमंत्रण दिलं. जेबा सलमानसोबत डिनरला गेली तेव्हा राजीवही तिथे पोहोचले. सलमानला ही गोष्ट आवडली नाही आणि दोघांमध्ये वाद झाला. अशा बातम्याही आल्या होत्या की या दोघांमधील वाद एवढा वाढला होता मारामारीपर्यंत प्रकरण गेलं होतं.

सलमान म्हणााल हा तर पब्लिसिटी स्टंट
रिपोर्टनुसार, आरके बॅनरच्या नायिकेचे नाव इतर कोणाशीही जोडले जाऊ नये अशी राजीव कपूर यांची इच्छा होती. जेबा त्यांची पाहुणी होती. यामुळेच ते तिच्यासाठी अधिक सजग होते. दुसरीकडे, सलमान खानने स्पष्टीकरण देताना राजीव कपूर यांनी या सर्व गोष्टी फक्त प्रसिद्धीसाठी केल्याचं म्हटलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here