रिंकू शर्मा याची आई राधा शर्मा यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. माझा मुलगा त्या दिवशी मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेला होता. तिकडून तो घरी आला. थोड्या वेळाने काही जणांनी माझ्या मुलाला फरफटत बाहेर नेले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले.
तक्रारीनुसार, दानिश हा इस्लाम, मेहताब आणि जाहीदसोबत बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घरासमोरील गल्लीत आले. त्यांच्याकडे शस्त्रे आणि काठ्या होत्या. रिंकूच्या घराबाहेर येऊन ते शिवीगाळ करू लागले. मनु आणि त्याचा भाऊ रिंकू याने त्यांना हटकले. याचदरम्यान वाद वाढला. इस्लाम याने रिंकूचा गळा पकडला आणि त्याच्यावर हल्ला केला. मेहताब याने रिंकूवर चाकूने सपासप वार केले. मनु आणि रिंकूचा मित्रही धावून आला. त्याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. मनुने रिंकूला रुग्णालयात नेले. तेथे मनुला आणि त्याच्या मित्रालाही दाखल केले. उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाला.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. या घटनेमागे मोठा कट आहे. रिंकू शर्माच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. कंगना रनौटनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक व्हिडिओ रिट्वीट केला आहे. रिंकू शर्माच्या वडिलांचे दुःख जाणून घेतले पाहिजे, एका हिंदूची हत्या केली आहे, असे ती म्हणाली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times