मूळची बीडची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे.
वाचा:
पुणे भाजपच्या महिला अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक मुलगी शिकण्यासाठी पुण्यात येते आणि अचानक आत्महत्या करते हे संशयास्पद आहे. तिला असा कुठला त्रास होता? तिच्यावर कोणाचा दबाव होता का? कुणी तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं का? या प्रकरणात एका मंत्र्याचं नाव पुढं येतंय. पोलिसांनी याचा तपास करायला हवा,’ अशी मागणी अर्चना पाटील यांनी केली आहे.
वाचा:
पुण्यातील पत्रकार परिषदेत काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं. ‘तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राज्यातील एका मंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात येत आहेत. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी या घटनेबाबत तत्काळ कारवाई करून सत्य समोर आणलं पाहिजे. ते लपविण्याचं काहीच कारण नाही,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times