सिल्लोड शहरातील शेकडो कुत्र्यांना नावाचा झालेला आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी सिल्लोड शहरातील नागरिकांनी केली आहे.
सिल्लोड शहरासह तालुक्यात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागच्या वर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले होते. शहरात प्रत्येक गल्लीत कुत्र्यांची दहशत आहे. शहरात अनेक भटके कुत्री आहेत. त्यांना त्वचारोगाने ग्रासले आहे. त्यांच्यामुळे इतर कुत्र्यांनाही संसर्ग होत आहे. नागरिकांनाही धोका होण्याचा संभव आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वाचा:
कुत्र्यांना झालेला हा त्वचारोग कॅनाइन मेंज नावाचा संसर्गजन्य विकार आहे. या आजारामुळे प्रचंड खाज येऊन त्यांच्या अंगावरील केस गळून पडतात. या कुत्र्यांपासून इतर पाळीव प्राण्यांना संसर्ग होतो. या कुत्र्यांमुळे खेळणाऱ्या लहान मुलांना अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यांच्या गळालेल्या केसांमुळे बऱ्याच जणांना अॅलर्जिक दम्याचा त्रास होतो व आधीच दमा असलेल्या व्यक्तींचा त्रास बळावतो. ही साथ निश्चित आटोक्यात आणता येते. पशुवैद्यकीय तज्ञांच्या सल्ला व उपचारांनी यातून त्यांची सुटका करता येते. दमा असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे ‘अभिनव प्रतिष्ठान’चे डॉ. संतोष पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times