मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. शिवाय ”चं चित्रीकरण सुरु आहेच. या सगळ्या कामांसाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतंय. असं असताना सोशल मीडियावर त्याचा एक फोटो सध्या चर्चेत आलाय. या फोटोत तो लहान मुलांसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतोय.

अभिनेत्री यांनी त्यांच्या दोन नातवंडांसोबतचा सलमानचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी काही कॅप्शन दिलं नसलं तरी, चाहत्यांनी मात्र, या फोटोवर लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, सलमानच्या एका चित्रपटाचं काम पुढील महिन्यापासून सुरू होणार असल्यानं त्याला अजून एका ठिकाणी जावं लागणार आहे. हे ठिकाण आहे तुर्की आणि चित्रपट आहे ”. ” या सिनेमाच्या साखळीतील हा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण युएईमध्ये होणार होतं. पण आता हे ठिकाण बदललंय. याचं चित्रीकरण आता इस्तांबुलमध्ये होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची टीम रेकीसाठी तुर्कीला पाठवली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ हा शो संपल्यानंतर पुढील महिन्यात सलमान चित्रीकरणाला सुरुवात करेल असं दिसतंय. या सिनेमासाठी सलमान फिटनेसचं प्रशिक्षण घेत असल्याचंही कळतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here