कौशांबी: प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाची करण्यात आली. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली. गर्लफ्रेंडनेच तिच्या दोन मित्रांच्या मदतीने तरुणाची हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह एका फ्लॅटमध्ये ठेवून पसार झाले, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर घटना उघड झाली. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.

गाझियाबादमधील वैशाली सेक्टर ४मध्ये बुधवारी एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. नितीन चौधरी असे मृताचे नाव असून, तो सिकंदरपूरमधील रहिवासी होता. शवविच्छेदन अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एका आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपी तरुणीचा शोध सुरू आहे.

बेडशीटमध्ये गुंडाळून किचनमध्ये मृतदेह ठेवला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनचे मोबाइल कॉल तपासले असता, त्याचे एका तरुणीशी बोलणे व्हायचे. नितीन आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद होऊ लागले. तिने दोन मित्रांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. आरोपींनी फ्लॅटमध्ये हत्या करून मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळून किचनमध्ये ठेवला आणि ते पसार झाले.

फ्लॅटचा मालक आठ महिने आलाच नाही

फ्लॅटचा मालक दिल्लीत राहतो. त्याने आपल्या एका मित्राला फ्लॅट भाडेतत्वावर दिला होता. त्याच्या मित्राची चौकशी केली असता, त्यानेही तिसऱ्याच व्यक्तीला फ्लॅट भाडेतत्वावर दिला होता. करोना काळात मालक फ्लॅटवर आला नव्हता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here