अमरावती जिल्ह्यातील शिरखेड () पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका गावातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नीलेश मेश्राम याला अटक केली. चौकशीत नीलेशने इतर आरोपींचीही नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली. सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याचे सांगताच, आरोपींनी तिची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.
स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने फरार आरोपींना अटक केली. नीलेश मेश्रामने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फरार आरोपींना मोबाइल लोकेशनच्या आधारे अटक केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times