वाचा:
जेजुरी गडावरील पायरी मार्गावर जेजुरी संस्थानाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते उद्या दुपारी होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच आज पहाटे पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी जेजुरीत जाऊन पुतळ्याचं अनावरण केलं. औपचारिक कार्यक्रमाच्या आधीच हे अनावरण करण्याचं कारण सांगताना पडळकर यांनी पवारांवर टीका केली. ‘पवारांसारख्या भ्रष्ट, जातीयवादी आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नयेत म्हणून आम्ही हा अनावरण सोहळा उरकल्याचं ते म्हणाले. अहिल्यादेवींच्या कार्याच्या नेमके उलट कार्य पवारांचे आहे. त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणं हा अहिल्यादेवींचा अपमान करण्यासारखं आहे,’ असंही ते म्हणाले होते.
वाचा:
आव्हाड यांनी पडळकरांच्या या टीकेला एका व्हिडिओच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शरद पवारांवर टीका केली की हेडलाइन होते, हे महाराष्ट्र गेल्या ४० वर्षांपासून पाहतो आहे. पडळकरांनाही ही कला उमजलीय,’ असा चिमटा आव्हाड यांनी काढला. ‘पडळकरांनी एखाद्या चोरासारखं पहाटेच्या अंधारात अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यात हिंमत होती तर दुपारी अनावरण करायचं. सांगून करायचं. उद्या साहेब तिथं येणार आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा. तुम्हाला पुन्हा कदाचित उभंही राहता येणार नाही,’ असा इशारा आव्हाड यांनी पडळकरांना दिला.
वाचा:
‘तुम्हाला बोलता येतं, तसं आम्हालाही बोलता येतं. तुम्हाला जसं वागता येतं, तसं आम्हालाही वागता येतं. आम्ही मर्यादा बाळगून आहोत, म्हणून आम्ही कमी आहोत असं समजू नका. एक संस्कारक्षम रयत निर्माण करण्याचं कार्य ज्या माऊलीनं केलं, तिचं नाव घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करू नका,’ असा विनंतीवजा सल्लाही आव्हाड यांनी पडळकरांना दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times