पुणे: भाजपचे आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर कडवट भाषेत टीका केल्यानं पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. गृहनिर्माण मंत्री यांनी पडळकरांचा समाचार घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री यांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ( Taunts )

वाचा:

जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच आज पहाटे जेजुरी येथे कार्यकर्त्यांसह जाऊन पडळकर यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. त्याचं कारण सांगताना त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवार हे वाईट प्रवृत्तीचे, भ्रष्टाचारी व जातीयवादी आहेत. त्यांच्यासारख्याचा हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये म्हणून आम्ही अनावरण केलं, असं पडळकर म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना आव्हानच दिलं आहे. ‘उद्या पवार साहेब जेजुरीत येत आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना पडळकरांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. ‘पडळकरांचं हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ज्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची का एवढी नोंद घेता तुम्ही?,’ असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला. ‘पडळकरांना जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट मिळून पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालंय. त्यांच्यावर काय प्रश्न विचारता? लोकांनीच ज्यांना नाकारलंय त्यांना इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही,’ असा सणसणीत टोला अजित पवार यांनी हाणला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here