प्रियांकानं तिच्या पुस्तकात तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल लिहिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, ‘२००० मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर एका दिग्दर्शकाची तिनं भेट घेतली होती. त्या दिग्दर्शकानं मला वॉक करायला सांगितलं. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ्या शरीररचनेत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मला अभिनेत्री व्हायचं असेल तर मला हे सर्व करावं लागेल असं त्यांनी मला सांगितलं. ते लॉस एंजलिसमधल्या एका डॉक्टरला ओळखत होते, त्या दिग्दर्शकानं मला तिथल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी असलेल्या माझ्या मॅनेजरनं त्या दिग्दर्शकाच्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या. त्या दिग्दर्शकासोबत करार करुन त्यांनी पाठवला होता’ या संपूर्ण घटनेमुळे प्रियांका दु:खी झाली आणि तिनं तिच्या मॅनेजरला त्यावेळी पदावरुन काढून टाकलं होतं.
अनेक गोष्टींचा खुलाासाया पुस्तकातून प्रियांकाचा बॉलिवूडमधला प्रवास, अफेअर्स, निकवरचं प्रेम आणि हॉलिवूडमधील एंट्री या आयुष्यातील सर्वच घडामोडींबद्दल प्रियांकाचं म्हणणं जाणून घेता येईल. पुस्तकाचं मुखपृष्ठ तिनं चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times