मुंबईः शिवजयंती साजरी करण्यासंबंधी राज्य सरकारने एक नियमावली जारी करत शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते आक्रमक झाले असून सरकारवर टीका सुरु केली आहे.

लॉकडाऊनमुळं बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यान (राणीची भाग) १५ फेब्रुवारीपासून खुले होण्याची शक्यता आहे. हाच धागा पकडत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचाः

आशिष शेलार यांनी एक ट्वीट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी ‘भायखळ्याला पेंग्विन पहायला १६ फेब्रुवारीपासून याचचं हं! सरकारचं असं आमंत्रण आलंय बरं का! पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा! अजब वाटले तरी नियम पाळा!! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे,’ असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

वाचाः

काय आहे संपूर्ण प्रकरण?

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं अवाहन शिवप्रेमींना केलं होतं. तसंच, यासाठी नियमावलीही जारी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर भाजपनं आक्षेप घेतला असून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर, सरकारकडून शिवजयंतीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here