वाचा:
‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’ निमित्त जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दुपारी ते चोपडा शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जेजुरी गडावरील पायरी मार्गावर जेजुरी संस्थानाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण यांच्या हस्ते उद्या दुपारी होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच आज पहाटे पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी जेजुरीत जाऊन पुतळ्याचं अनावरण केलं. या प्रकराबाबत जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.
वाचा:
‘आततायीपणा किती करायचा याला काही मर्यादा असते. पण मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे? स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे, सन्मानाने ज्यांना बोलावले आहे, त्यांच्या हस्ते जे उदघाटन आहे, त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे,’ अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून…
राज्य शासनाने शिवजयंती सार्वजनिकपणे साजरी करण्यावर बंधने घालून दिली आहेत. शासनाच्या या निर्णयाला विरोधकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे, याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची काळजी शासनाच्या अधिकृत स्तरावरून घेतली जात आहे. त्यानुसार आम्हीही शासनाच्या नियमांचे पालन करत आहोत. करोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सहकार्य केले आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यातील त्या तरुणीच्या आत्महत्येबद्दल सविस्तर बोलणे टाळले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times