म. टा. प्रतिनिधी, नगर: ‘राजकीय हेतूने प्रेरित होऊन तसेच सूडाची भावना लक्षात घेऊन सारख्या संस्थांचा वापर केला जाऊ नये. जर अशा पद्धतीने ईडीचा वारंवार वापर केला जात असेल, तर ईडी वर लोकांचा विश्वास राहणार नाही,’ असे सांगतानाच मंत्री यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ‘एखाद्या प्रकरणात तथ्य असेल तरच ईडी सारख्या संस्थांचा वापर करणे उचित ठरेल,’ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका तसेच नगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत मागणी जोर धरत आहे. त्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, ‘औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही लोकांची मागणी आहे, व ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हे नामांतराचे धोरण ठरवताना औरंगजेबाबाबत कोणालाही प्रेम असण्याचे कारण नाही. छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या राज्याची व राष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मागणी लक्षात घेऊन त्याबाबत आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट केले आहे. तसेच इतर शहराच्या नामांतरणबाबत तेथील लोकांची काही मागणी असेल ,तर जनतेसोबत आम्ही आहोत,’ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

वाचाः

विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निर्णय घेतील, असे ही शिंदे म्हणाले. तर राज्यपाल यांना विमान नाकारण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य ते स्पष्टीकरण देण्यात आले आहे,’ असे सांगतानाच त्याबाबत अधिक बोलणे शिंदे यांनी टाळले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here