: राजस्थानातील जयपूर शहराच्या सध्या चर्चेत आहेत. जयपूर महानगरपालिकेच्या (ग्रेटर) महापौरपदी डॉ. सध्या विराजमान आहेत. सौम्या यांनी गुरुवारी एका गोंडस दिलाय. परंतु उल्लेखनीय म्हणजे, डिलिव्हरीच्या अगदी काही तास अगोदरपर्यंत महापौर आपल्या कामात व्यग्र होत्या.
गुरुवारी सकाळी ५.१४ मिनिटांनी डॉ. सौम्या गुर्जर यांनी एका बाळाला जन्म दिला. यापूर्वी, बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्या आपलं काम हातावेगळं करत होत्या. ” असल्याचंही सौम्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
‘कर्म हीच पूजा! रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका कार्यालयात बैठक घेतली. प्रसववेदना सुरू झाल्यानंतर रात्री १२.३० वाजता कुकून रुग्णालयात दाखल झाले आणि सकाळी ५.१४ वाजता परमेश्वराच्या कृपेनं मुलाला जन्म दिला. मी आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे’ असं ट्विटही गुरुवारी सकाळी ७.४१ मिनिटांनी डॉ. सौम्या यांनी केलं.
त्यांच्या या पोस्टवर एव्हाना लाईक्सचा पाऊस पडलाय. अनेक जण डॉ. सौम्या यांच कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times