अंकारा: काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान आणि एकमेकांना साथ देत असताना ग्रीस माध्यमांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानच्या मदतीसाठी तुर्की भाडोत्री दहशतवादी काश्मीरमध्ये पाठवणार असल्याचे वृत्त ग्रीसच्या माध्यमांनी दिले आहे. या भाडोत्री दहशतवाद्यांच्या मदतीने काश्मीर खोऱ्यात हिंसाचार फैलावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ग्रीसमधील पेंटापोस्टाग्मा (Pentapostagma) या वृत्तसंकेत स्थळावर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तुर्कीचे भाडोत्री सैनिक संघटना असलेल्या सादात काश्मीरमध्ये सक्रिय होण्याची तयारी करत आहे. तुर्कीला मध्य आशियात प्रमुख शक्ति म्हणून उदयास यायचे आहे.त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला जवळ केले असून काश्मीरमध्ये हिंसाचार फैलावण्याचे काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेचप एर्दोगन यांच्या एक सैन्य सल्लागाराने काश्मीरबाबत अमेरिकेत सक्रिय असणाऱ्या एका दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांचे सहकार्य घेतल्याचे वृत्त आहे.

वाचा:
पेंटापोस्टाग्माने (Pentapostagma) दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीचे राष्ट्रपती रेचप एर्दोगन यांनी काश्मिरबाबतची जबाबदारी सादातला दिली आहे. सादातचे नेतृत्व एर्दोगनचे सैन्य सल्लागार अदनान तनरिवर्दी करतात. काश्मीरमध्ये तळ करण्यासाठी सय्यद गुलाम नबी फई या दहशतवाद्याची नियुक्ती केली आहे. फई पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या आर्थिक पाठबळावर दहशतवाद्यांची भरती करणे आणि कर चोरीच्या प्रकरणात अमेरिकेच्या तुरुंगात दोन वर्षाची शिक्षा भोगून आला आहे.

वाचा:

सय्यद गुलाम नबी फईचा जन्म जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. कट्टरवादी संघटना जमात-ए-इस्लामीचादेखील सक्रिय सदस्य आहे. फईने अमेरिकेमध्ये काश्मीरमध्ये हिंसाचाराचा कट रचण्यासाठी अमेरिकी कौन्सिल ऑफ काश्मीरची स्थापना केली होती. या संस्थेला आयएसआयकडून निधी दिला जातो. याची पुष्टी अमेरिकेच्या एफबीआयने केली होती.

वाचा:

SADAT काय आहे ?

सादात भाडोत्री दहशतवाद्यांचा गट आहे. तुर्की, सीरिया, लिबीयासह अनेक देशांतील दहशतवाद्यांना प्रशिक्षित करणे आणि शस्त्रांची रसद पुरवण्याचे काम करतो. यामध्ये मोठ्या संख्येने तुर्कीचे निवृत्त सैनिकही सहभागी आहेत. सादातकडून मुस्लिम देशातील हजारो दहशतवाद्यांना एकत्रित करून इस्लामी सेना बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here